मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज हिंगणघाट शहरामध्ये माजी आमदार राजू तिमांडे हे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होणार आहे. एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये अनेक राजकीय फेरबदल होताना दिसून येत आहे. यात राजू तीमांडे हे आपले जुने सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्यासोबत परत नव्या उमेदीने काम करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर राजू तिमांडे यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र सध्या सर्वत्र परिस्थिती वेगळी आहे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असे चित्र अजिबात नाही. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, व शिंदे शिवसेना यात हिंगणघाट शहरामध्ये भाजप व आता राजू तिमांडे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष भक्कम मजबूत पहावयास मिळेल. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोठी ताकद तर शिवसेना उबाठा पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात असल्याने हे दोनही पक्ष प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरात जेमतेम बांधणी असल्याने हा पक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिंदे शिवसेनेप्रमाणेच मागे पहावयास मिळेल. मात्र यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्ष हा अतिशय मजबूत असल्याने व ओबीसी किंवा ओपन अशी उमेदवारी थेट जनतेच्या नगराध्यक्षाची आल्यास राजू तिमांडे यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाईल.
यामुळे आज राष्ट्रवादीमध्ये होणारा राजुतिमांडे यांचा प्रवेश हिंगणघाट नगरपालिकेचे चित्र बदलवणारा असेल. एडवोकेट सुधीर कोठारी यांनी तत्पूर्वी हिंगणघाट नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पद भूषवले आहेत. मात्र मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट सुधीर कोठारी यांची जमानत जप्त झाली होती. यामुळे कोठारी यांचा ती मांडे यांच्यावर डाव लावण्याचा हा पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून प्रयत्न तर नाही नाही चर्चा सध्या हिंगणघाट शहरात सुरू आहे. एकंदरीतच राजू तिमांडे हे जर राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार झाल्यास राष्ट्रवादी पक्ष हा मोठा पक्ष म्हणून हिंगणघाट नगर पालिकेत पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

