अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती महाजन लेआऊट वार्ड नं. ८ सावनेर येथे २ दिवसीय गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
१५ ऑगस्ट ला सकाळीं ८ वा.श्रीचा महाअभिषेक व तीर्थ स्थापना आरती झाली. दुपारी १२ ते ३ वा.पर्यंत महिला भजन मंडळ तर्फे भजन संध्या चा कार्यक्रम झाला. दुपारी ४ ते ६ वा.पर्यंत गोतमारे गुरुकुल सावनेर तर्फे भजन संध्या चा कार्यक्रम झाला. रात्री ९ ते १२ वा.पर्यंत ह. भ.प.श्री.प्रभाकर महाराज भुसारी श्री.क्षेत्र ब्रह्मपुरी यांचे कीर्तन व कृष्णजन्मोत्सव.रात्री १२ वा.आरती करण्यात आली.
१६ ऑगस्टला सकाळी ९ ते १० वा. पर्यंत पालखी सोहळा. दुपारी ११ ते २ पर्यंत गुरुवर्य ह.भ.प.श्री.यश महाराज निंबाळकर(आळंदीकर) श्री.क्षेत्र सावळी यांचे काल्याचे कीर्तन आटोपले. कीर्तन साथ संगत ह.भ.प. अमित महाराज करडभाजने. सायंकाळी ६ वा.देवाची महाआरती झाली.आरती नंतर लगेच सा.७ ते १० वा.पर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.तसेच मल्हार म्युझिकल इव्हेंट तर्फे भजन संध्याचा कार्यक्रम पार पडला. हजारो भाविकांनी आनंददायी धार्मिक सोहळ्यात उपस्थिती दर्शविल्याची महिती श्री.राधा कृष्ण देवस्थान समिती सावनेर द्वारे देण्यात आली.

