अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 14 वर्ष वयोगट मुलाच्या स्पर्धेत कुमार मोहक छत्रे ह्या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक तर अंडर 17 वर्ष वयोगट मुलाच्या स्पर्धेत आर्यन पंचवटे, अंडर 17 वर्ष मुलींची वयोगटात कुमारी वंशिका निर्मल,भक्तिका पेठे (सीबीएसई बोर्ड) व कुमारी विना वरवडे (स्टेट बोर्ड) हे विद्यार्थी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले.
ह्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, अक्षय घोरमारे, प्रविना पार्से, दिनेश निखाडे तसेच आई-वडिलांना दिले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जीवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृन्द यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

