युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळी खुर्द येथे बैलांचा पोळ्यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील शेतकऱ्यांनी बैलांना रंग रंगोटी बैलांच्या अंगावर झुला व घुंगराच्या माळा सिंगाला बेगड लावून रंगरंगोटी करण्यात आली त्याचप्रमाणे घुंगराच्या माळा घालून बैलांना सजवण्यात आले त्यानंतर चार वाजता गावातील मुख्य मार्गावर मंदिरासमोर तोरणामध्ये बैल आणण्यात आले यावेळी बैलांचा सण गावकऱ्यांनी झडत्या देऊन बैलांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तशेश शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण दिसत होते.
यावेळी गावातील प्रमुखांनी बंडुजी चोरे ज्ञानेश्वर सावरकर नरेश कुकडे यांनी बैलांना अंगावरून गुडी फिरून पाणी व घास फिरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी सरपंच मंगेश चोरे, माजी सरपंच सुधीर कुकडे, माजी पोलीस पाटील राजेंद्र बागडे तसेच पोलीस पाटील निकेश बागडे प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये तुळशीराम सावरकर, रामकृष्ण सावरकर, फुलचंद पाटील, भूषण सावरकर, काकाराव बागडे, बाबाराव बाराई, अनिल कुकडे, राजेंद्र सावरकर, गोपाल लोखंडे, अरविंद कुकडे, चंद्रभान सावरकर, चंद्रपाल बागडे, शांताराम बावणे, महादेव चोरे, महादेव चव्हाण, विनायक कोहळे, श्रीकांत सावरकर, गोपाल लोखंडे, राजेंद्र सावरकर, कृष्णा लोखंडे, बापूराव बागडे, बबन खोब्रागडे, महादेव सावरकर व गावातील शेतकरी मंडळी व गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

