अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं.९८२२७२४१३६
सावनेर:- तालुक्यातील ग्रामपंचायत भानेगाव येथील वार्ड क्र. ५ येथे माजी सरपंच स्व. प्रभाकर नारायणजी ढोके यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनुसूचित जाती नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकी व जल शुद्धीकरण केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यावर माजी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री आ. सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आ. केदार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्व. प्रभाकरराव ढोके यांच्या स्मृतीत बांधण्यात आलेल्या या पाण्याच्या टाकीमुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. १५ वर्षे भानेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच काळात त्यांनी जुन्या व नवीन भानेगाव येथे पेयजलाची नागरिकांसाठी जी व्यवस्था केली त्यामुळे या गावांत कधीच पाण्याची अडचण जाणविली नाही. नागरिकांचे श्रम मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. स्व. बाबासाहेब केदार व प्रभाकर ढोके यांच्या प्रयत्नानेच बिना व भानेगाव या पुनर्वसित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झालीत. त्यांनी त्यावेळी केलेल्या कामामुळेच आज या दोन्ही वस्त्यांमध्ये अडचणी नाहीत. आजही त्यांच्या कामाचे पुरावे दिसत आहेत. लोकसंख्या वाढल्याने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना शुद्ध पेयजलासाठी त्यांच्या स्मृतीमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकी नवसंजीवनी ठरणार आहे, असेही मत व्यक्त केले.
यावेळी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, भानेगावचे सरपंच रवींद्र चिखले, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, जि.प. सदस्य निलिमा उईके, पं.स. सदस्य प्रफुल्ल करनायके, माजी. जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी पं.स. उपसभापती पुष्पा ढोके, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रामेश्वर प्रभाकर ढोके, राजेंद्र प्र. ढोके, जि.प.चे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संजय प्र. ढोके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

