अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं-९८२२७२४१३६
सावनेर:- येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंन्द्रशेखर बावनकुळे यांची जय माता दी दुर्गा मंदीर जुना धान्यगंजला भेट देऊन पुजा अर्चना केली.
यावेळी सोनबाजी मुसळे, रामराव मोवाडे, मंदार मंगळे उपस्थीत होते. मंदीर समितीचे प्रा कमल भारव्दाज यांनी चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
देवी मंदीरा समोर अनेक वर्षापासुन शहराच्या मध्य भागात खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करुन कोंबडीचे मास (चिकन) व मच्छीची विक्री करतात त्यामुळे घान पसरलेली असुन आजुबाजूच्या नागरिकांना गंभीर स्वरूपाचा डेंग्यू, मलेरिया टायफाईड सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेद्वारा २० लाख रु. खर्च करून चिकन, मच्छी, मार्केट ३ वर्षापासुन बनवीले परंतु लाचखात कामचुकार मुख्याधिकारी न.प. द्वारा टाळाटाळ करित असून न.प.च्या किराया पोटी लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्याबत विस्तृत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
बावनकुळे यांनी निवेदनाची त्वरीत दखल घेत लवकरात लवकर समस्यांचे निवारण आश्वासन दिले. या प्रसगी मंदीर समीतीचे राजेश भारदाज, मनोज गुप्ता, अरुण रुषीया, गणेश बागडे , नारायण पारवे व अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.