मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्र परिवारातर्फे रविवार १४ सप्टेंबर, २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिर आणि ‘मेडिकल साहित्य’ लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रत्न विद्या निकेतन आणि बन्सीलाल कटारिया हायस्कूल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हा दुहेरी उपक्रम पार पडणार आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्त संकलन करणे हा आहे. ‘तुमचे एक युनिट रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते’ या संदेशासह संस्थेने जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या शिबिरात जिल्हा रुग्णालय वर्धा, कस्तूरबा रुग्णालय सेवाग्राम आणि लाइफलाइन ब्लड बँक, नागपूर येथील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. रक्तदान शिबिरासोबतच याच कार्यक्रमात ‘मेडिकल साहित्य’ लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. यामध्ये मेडिकल बेड, व्हीलचेअर, वॉकर यांसारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी हे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
संस्थेच्या या उपक्रमामुळे समाजातील अनेक गरजू व्यक्तींना मोठा आधार मिळणार आहे. नारायण सेवा मित्र परिवार ही संस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापूर्वीही संस्थेने अनेक रक्तदान शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. रक्तदान करण्यासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी किशोर जेस्वानी, पराग मुडे, विक्की ठाकूर, गौरव सायंकर, दुर्गाप्रसाद यादव, अमोल भूतड़ा, रवि दुरशेट्टीवार,अनुराधा मोटवानी, लितिका बेलेकर, राखी बेतवार वीरश्री मुड़े, किरण अग्रवाल आणि नंदिनी जवादे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी केले आहे.

