महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेशातील बागपत मधील टीकरी कसबातील पट्टी भोजान गावातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. येते एका जन्मदात्या मातेने आपल्याच पोटच्या तीन मुलींची हत्या करून त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजन वय 7 वर्ष, किट्टू वय 2 वर्ष आणि मीरा वय 5 महिने असे हत्या करण्यात आलेले तिन्ही मुलीचे नाव आहे, तेज कुमारी वय 29 वर्ष असे महिलेचे नाव असून कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेने हे खळबळजनक पाऊल उचलले.
तेज कुमारी हिने घरगुती वादातून तिच्या तीन निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. दरम्यान या घटनेची माहिती होताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत तपास सुरू केलाय.
प्राप्त माहितीनुसार तेज कुमारी हिच्या पतीचे नाव विकास असून तो अशिक्षित असून टुरिस्ट बस ड्रायव्हर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री तेज कुमारी हिने तीन चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. तिन्ही मुलीची हत्या केल्यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केली.
तेज कुमारी उच्च शिक्षित असुन तिचा पती विकास हा अशिक्षित आहे. ती आपल्या मुलीना चांगल शिक्षण मिळावे मागील काही दिवसांपासून यांच्यात दिल्ली येथे राहण्यासाठी वाद सुरू होता. कटकटीमुळे विकास आणि तेज कुमारी यांच्यात भांडणं होत होती. त्याच कारणातून तेज कुमारी महिलेनं तीन मुलीची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले.
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केली. तिन्ही मुलांचे आणि आईचे मृतदेह पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. शेजारीली लोकांचा जाब घेतला जात आहे.

