संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थीनींनी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत विभागीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. इन्फंट काँन्व्हेंट च्या निहारिका भलमे, रश्मी देशमुख, लावण्या सूर्यवंशी, मानवी पिंगे या विद्यार्थिनींची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबाबत संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, सहायक शिक्षक सुभाष पिंपळकर , शिक्षिका प्रज्ञा कांबळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या.

