रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यातील परतूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.विशेषतः परतूर–रांजणी मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे परतूर ते रांजणी असा नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा दैनंदिन व्यवहारासाठी रांजणीला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मुसळधार पावसामुळे शेती पिकांनाही दिलासा मिळाला असला तरी वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. सध्या पुलावरील पाण्याचा जोर कायम असल्याने नागरिकांना प्रवासासाठी थांबावे लागत आहे.

