विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो.न. 9421856931
एटापल्ली-बोलेपल्ली-देवदा हा प्रमुख मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. या मार्गावर अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण अपघातांत गेलेले आहेत, ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना तहसीलदार एटापल्ली मार्फत सादर करण्यात आले. शासन व प्रशासनाने अद्याप ठोस पावले न उचलल्यामुळे हा प्रश्न अधिक बिकट होत असून सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
१. एटापल्ली–बोलेपल्ली-देवदा मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात यावे.
२. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
३. शासन व प्रशासनाने या संदर्भात लेखी हमी व जबाबदारी स्पष्ट करावी.
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वरील मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या अडचणीस तसेच संभाव्य नागरिकांच्या जीवितहानीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी निवेदन देताना अक्षय पुंगाटी शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, नामदेव हिचामी शहर प्रमुख, प्रशांत तलांडे तालुका समन्वयक, विनोद मडावी तालुका संघटक, रुषभ दुर्गे युवासेना शाखा प्रमुख, मंगेश हिचामी, अनुज मिंज, राजु हिचाम�

