युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
9923296442
नागपूर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित 66 वा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा मुख्य सोहळा बुधवारी 5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थिती राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदत्न आर्य नागाअर्जुन सुरेई ससाई असतील.
देशातील तंम्माम दिन दलिताच्या उद्धारांचा मार्ग खुला करून त्यांना उज्वल भविष्याची दिशा दाखवणारे युग नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिष्ट रूढी व परंपरे अडकलेल्या समाजाला मुख्य प्रवाह करण्यासाठी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली आणि आपल्या लाखो बांधवांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दर अशोक विजयादशमीला धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील ध्वजाचे स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससई यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाचे मानवंदना देण्यात आली. यावेळी समितीचे सचिव डॉक्टर सुधीर फुलझले सदस्य विलास गजघाटे व इतर मान्यवर उपस्थित होते बुधवारी सकाळी आठ वाजता बुद्ध वंदना घेतली जाईल व सायंकाळी सहा वाजता दीक्षा चा मुख्य सोहळा होईल.

