मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्राथमिक आरोग्य केंद्र बुरकोणी येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियाना अंतर्गत महिलांकारिता विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी शिबिराचे उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजय बोरकर, माजी सरपंच, नीता धोटे, ग्राम पंचायत अधिकारी ग्रा. पं. बुरकोणी उपस्थित होते.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत दि. ९ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत आरोग्य संस्था मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महिला लाभार्थीना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र बुरकोणी येथे आयोजित शिबिराला जिल्हा स्तरावरून हुसेन शेख व गजानन पिसे, जिल्हा पर्यवेक्षक उपस्थित होते. या वेळी १७४ लाभार्थीची तपासणी करण्यात आली व त्यांना खालील प्रमाणे आरोग्य सेवा देण्यात आल्या, तसेच आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात आली. यावेळी पोषण आहार प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती व उपलब्ध स्थानिक पोषण आहारा बद्दल माहिती देण्यात आली.
या प्रसंगी डॉ. अक्षय राडे व डॉ. शोभा लांजेवार वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बुरकोणी,डॉ. तुळसकर ,स्त्री रोग तज्ञ,डॉ. प्रशिक ठमके मोबाईल युनिट हिंगणघाट, प्रा.आ. केंद्र बुरकोणी येथे कार्यरत अमित कोपुलवार, कलोडे, बागडे आरोग्य सहाय्यक, कु. स्वाती ताकसांडे आरोग्य सहायिका, डुकरे पी.ओ, फुलझेले प्रयोगशाळा, शुभमं कुमरे, करपे, बुरीले गायकवाड आरोग्य सेवक थुल, माहुरे, देठे आरोग्य सेविका, मुडे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बंडू खोडे ग्रामपंचायत कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

