महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- धुळे जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. नराधम चुलत काकानेच नात्याला काळीमा फासला आहे. सर्वत्र नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर करत कुमारीकेची पुजा केली जात असतानाच दुसरीकडे अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे.मयुर माळी असे नराधम आरोपीचे नाव आहे. सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयुर माळी याला बेड्या ठोकल्या आहे.
ही घटना समोर येताच संतप्त गावकऱ्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत नराधम आरोपी मयुर माळी याच्यावर कडक कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवत त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार ‘सायंकाळच्या सुमारास एक दुधवाला आला असता, सासू दुध घेण्यासाठी गेल्या, तेव्हा तीन वर्षांची मुलगी देखील गेली होती. थोड्या वेळानंतर सासुबाई घरात आल्या तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ती चुलत काका मयूर माळी आला होता, तो तिला खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला होता. थोड्या वेळानंतर ती घरी आली रात्री झोपण्याची तयारी करताना लहान पीडिता मुलगी रडू लागली होती. तेव्हा काय झालं? असं विचारलं. तेव्हा तिचं गुप्तांग दुखू लागलं होतं. लहान मुलीने रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
काय आहे ही घटना: शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली. बाहेर एक बाबा आला आहे असं त्यानं तिला सांगितलं. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर चिमुकलीनं घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. हे संपूर्ण प्रकरण ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडितेची आई पोलिस ठाण्यात गेली आणि तिथे तक्रार नोंदवली.

