१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे केले आयोजन.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २ ऑक्टोबर:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती राजुरा गट शिक्षणाधिकारी मंगला तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामधे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे , कचरा वर्गीकरण चर्चा, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान स्वच्छता , स्वच्छता रॅली, एक तास स्वच्छतेचे धडे, स्वच्छता प्रतिज्ञा असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.
मध्य चांदा वनविभागाच्या निसर्ग निर्वाचन केंद्र वनोद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी वनविभागाचे गरमडे, क्षेत्र साहाय्यक राजुरा, पी.ए. मंदुलवार, नियत वनरक्षक राजुरा, रामपुर (अति), एस.आय.तोडासे, नियत वनरक्षक सुमठाना, एम.ए. चापले, नियत वनरक्षक चुनाळा, टी.ओ.कामले नियत वनरक्षक मुर्ती व रोजंदारी मजुर, आदर्श शाळेतील शिक्षक विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काउट्स गाईड्स युनिट विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहकार्याने “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
