मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 सप्टेंबर 2025 ला जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
फ्रीस्टाइल या प्रकारात 14 वर्षाखालील गटामध्ये भारत विद्यालयातील 57 किलो वजन गटांमध्ये ऋषिकेश रवींद्र शेंडे वर्ग 8 वा, 33 किलो वजनामध्ये कृतिका भारत कोकडे वर्ग 8 वा, 36 किलो वजन गटात राशी विनोद सातपुते वर्ग 7 वा. 17 वर्षे वयोगटांमध्ये 43 किलो वजन गटात. ज्ञानेश्वरी दीपक मेश्राम वर्ग 11 वा, भक्ती रवींद्र दुरबुडे वर्ग 10 वा, 46 किलो वजनामध्ये रुचिता रवींद्र शेंडे वर्ग 11 वा, 61 किलो वजनामध्ये पायल काशिनाथ इंगळकर वर्ग 10 वा, 69 किलो वजनामध्ये तसेच ग्रीको रोमन या प्रकारात 48 किलो वजन गटामध्ये यश महेंद्र मुक्तेवार वर्ग 11 या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय कुस्ती स्पर्धेकडचा आपले स्थान निश्चित केले आहे.
मिळालेल्या या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी उपाध्यक्ष शाम भाऊ भिमनवार, सचिव रमेश धारकर मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरीले, मनिषा कोंडावार, क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडा शिक्षक संदीप चांभारे, संजना चौधरी तसेच सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले पुढे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

