संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथील १७ वर्षांखालील वयोगटातील विद्यार्थिनी प्रिन्सि विजय बारई हिने बुद्धिबळ क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पक्की केली आहे.
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील रायसोनी कॉलेजमध्ये झालेल्या जिल्हा विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रिन्सिने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर प्रवेश मिळवला. तिच्या या यशामुळे संपूर्ण शाळा, संस्थाच नव्हे तर राजुरा तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, सहायक शिक्षक सुभाष पिंपळकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी यांनी प्रिन्सि हिचे मनःपूर्वक अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकवर्गाने प्रिन्सि बारईच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील प्रवास अधिक यशस्वी ठरो अशी अपेक्षा व्यक्त केली.

