Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नवी मुंबई: भर शाळेत विद्यार्थीनीचा मुख्याध्यापिकेने केला अपमान, 16 वर्षाच्या विद्यार्थीनीने उचललं टोकांचं पाऊल, सर्वच हादरले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 6, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
नवी मुंबई: भर शाळेत विद्यार्थीनीचा मुख्याध्यापिकेने केला अपमान, 16 वर्षाच्या विद्यार्थीनीने उचललं टोकांचं पाऊल, सर्वच हादरले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर सुलेमान खान नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- येथील एरोली येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. अनुष्का शहाजी केवळे वय 16 वर्ष असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या केल्या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलिस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आला आहे.

काय आहे ही घटना: प्राप्त माहितीनुसार, आत्महत्या करणारी अनुष्का केवळे ही विद्यार्थिनी ऐरोली येथील सुषिलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. तिची सध्या परिक्षा सुरू होती. मृतक अनुष्का 3 ऑक्टोबर रोजी शाळेत परिक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या बाकाखाली एक कॉपी मिळून आली. ती कॉपी अनुष्काने केल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यानंतर मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी संपूर्ण वर्गासमोर अनुष्काला अपशब्द वापरून फटकारले होते. शिवाय झोपडपट्टीवाले असे संबोधून तिचा सार्वजनिकरित्या अपमान केला, असा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली आलेल्या अनुष्काने त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलीने आत्महत्या केल्याने केवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी तात्काळ रबाळे पोलिस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे रबाळे पोलिसांनी सुषिलाबाई देशमुख विद्यालयात येथील मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत रबाळे पोलिसांनी सर्व घटना सांगितली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही प्रकरण नोंदवले आहे. आरोपानुसार विद्यार्थिनीला वर्गात अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती असं पोलीसांनी सांगितलं. ज्यामुळे तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असं ही पोलीसांनी सांगितलं.

या घटनेनंतर ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अपमानाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं वागलं पाहीजे याचीही चर्चा या निमित्ताने होत आहे.

Tags: @Crime news@Girl Suside@Tarunichi Aatmhatya@क्राइम घटना#New Mumbai crime#Tarunichi Aatmhatya
Previous Post

सावनेर येते दुर्गा मातेचे विसर्जन शोकात बदलले; दुर्गादेवीचे विसर्जन करताना तलावात बुडून एकाच दुर्दैवी मृत्यू.

Next Post

रानडुक्कराच्या हल्यात शेतकरी युवक गंभीर जखमी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रानडुक्कराच्या  हल्यात शेतकरी युवक गंभीर जखमी.

रानडुक्कराच्या हल्यात शेतकरी युवक गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In