Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गोंडपिपरी तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर तात्काळ उपाययोजना करा: माजी आमदार सुभाष धोटे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 7, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर तात्काळ उपाययोजना करा: माजी आमदार सुभाष धोटे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उपविभागीय अधिकाऱ्यांकडे काँग्रेसच्या वतीने नागरिकांचे निवेदन सादर.

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिक सध्या विविध ज्वलंत समस्यांनी त्रस्त झाले असून, त्या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या वतीने नागरिकांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना सादर करण्यात आले.


यावेळी नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच, वीजपुरवठ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने जोडणी देण्यात यावी, रेतीघाटांवरील अवैध उत्खनन तत्काळ थांबवावे, अशी नागरिकांची ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.

ग्रामीण भागातील जागेअभावी रखडलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५०० चौ.मी. जागा उपलब्ध करून द्यावी, गोंडपिपरी शहरातील मानव वस्तीजवळील घनकचरा संकलन केंद्रामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ते केंद्र तात्काळ हलवावे, इंदिरा नगर व इतर परिसरातील नागरिकांना मालकीहक्काचे पट्टे देण्यात यावेत, अशा मागण्या देखील निवेदनात मांडण्यात आल्या. याशिवाय, संविधान चौक ते धाबा रोड पर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व बंद असलेली सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करणे आणि ग्रामीण भागातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे या तातडीच्या उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने ठोस कारवाई करावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष राजु झाडे, युवक तालुकाध्यक्ष विपिन पेंदुलवार, अशोक रेचणकर, शुभम पिंपळकर यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: गोंडपिपरी तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर तात्काळ उपाययोजना करा: माजी आमदार सुभाष धोटे.
Previous Post

शेतात फवारणी करत असताना सर्पदंश झाल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

Next Post

राळापेठचे शेतकरी अभिलेखांअभावी त्रस्त; अधिकार अभिलेख पंजी तातडीने उपलब्ध करून देण्याची माजी आ. सुभाष धोटे यांची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राळापेठचे शेतकरी अभिलेखांअभावी त्रस्त; अधिकार अभिलेख पंजी तातडीने उपलब्ध करून देण्याची माजी आ. सुभाष धोटे यांची मागणी.

राळापेठचे शेतकरी अभिलेखांअभावी त्रस्त; अधिकार अभिलेख पंजी तातडीने उपलब्ध करून देण्याची माजी आ. सुभाष धोटे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In