कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी आज उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन: महेश नळगे
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना :- गेल्या महिन्यात पावसाने घातलेल्या धुमाकूळने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरक्ष देशोधडीला लागला असुन मराठवाड्यातील शेतकर्यांना या सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, परंतु सरकार हे कुंभकर्णी झोपेत असुन या कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी आज बुधवार दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12.30 या दरमयान परतुर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठवाडाव्यापी आंदोलन करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख धर्मराज दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपनेते लक्ष्मणतात्या वडले व जालना जिल्हा प्रमुख महेश नळगे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी व हेक्टरी 50 हजार रुपये अर्थिक मदत मिळावी यासाठी विविध आंदोलन करण्यात येणार आहेत तसेच संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट 50 हजार हेक्टरी मदत करावी व तसेच पीक विमयाचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनामयाची प्रक्रिया बाजुला ठेवत विमयाची रक्कम त्वरीत शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरीकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा या मागण्या घेऊन शिवसेनेने या मराठवाडाव्यापी आंदोलनाचे आयोजन केले होते.
दिनांक 08 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजता परतुर उपविभागीय कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनेे भव्य शेतकरी बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात शिवसैनिकांसह मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

