मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- चाळीस वर्षे जुन्या हिंगणघाट शिक्षण संस्थेची आज सहधर्मदाय आयुक्ताच्या निर्देशानुसार आज दि. 9 ऑक्टोबर 25 बाजार समितीच्या कापूस मार्केट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात निवडणूक पार पडली. या संस्थेचे ऐकूणं सहा सदस्य असून आज झालेल्या सभेत सहा पैकी चार सदस्य उपस्थित होते.
यावेळी चार जागासाठी चारच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व चारही उमेदवार अविरोध विजयी झाले. यात अध्यक्ष म्हणून ॲड. सुधीर कोठारी, कार्याध्यक्ष प्रा.दिनकर घोरपडे, सचिव नरेंद्र थोरात सहसचिव ओमप्रकाश डालिया यांची अविरोध निवड झाली.या निवडीचे घोषणा सहाय्यक निवडणूक अधिकारी राजू माळोदे यांनी केली. या संस्थेच्या निवडणुकी कडे हिंगणघाटच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले होते.
या निवडीबद्दल माजी आमदार राजू तिमांडे, समुद्रपूर बाजार समितीचे अध्यक्ष हिम्मतराव चतुर उपसभापती हरीष वडतकर, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, कामगार नेते आफताब खान, डॉ निर्मेश कोठारी, रामदास निभ्रड गुरुजी दिगांबर चांभारे,, मधुसूदन हरणे, डॉ निर्मेश कोठारी, राजु मंगेकर, प्रफुल्ल बाडे, घनश्याम येरलेकर, अशोक उपासे, संजय कातरे, पंकज कोचर, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे, हर्षद महाजन, महादेव बादले, अरुण बकाल, हेमंत पाहुणे, वणा नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश सायंकार, समुद्रपुर खरेदी विक्री उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकार, जनार्दन हूलके, भागचंद ओस्तवाल, राजेश कोचर, दिनेश कोचर, सचिन तुळणकर, हिंगणघाट खरेदी विक्री अध्यक्ष दिगांबर चांभांरे, नामदेव तळवेकर, प्रफुल्ल फुकट, संचालक तेजस तडस, समुद्रपुर पवन मुडे, रामभाऊ चौधरी, विष्णू कामडी, भुजंग चिखलकर, समीर शेख, कृष्णाजी झाडे, हरीभाऊ ठाकरे उपस्थित होते.

