संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरु झाली असून, या कामात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई तथा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या पत्रानुसार जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दि. ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हरकती नोंदविण्याची मुदत निश्चित करण्यात आली असून बैठकीत मतदार याद्यांच्या पडताळणीची दिशा, पद्धत व हरकती नोंदविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी शोधून त्यावर हरकती नोंदवाव्यात, तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनांच्या प्रती maharashtrapec. info@gmail.com या ई-मेलवर आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या ९३५९८४५३९१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडलेल्या बैठकीत मतदार याद्यांची अचूकता हीच लोकशाहीची खरी ताकद, असे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगत कार्यकर्त्यांना जबाबदारीने या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रे, प्रविण पडवेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, रंजन लांडे, उत्तमराव पेचे, गोविंदा उपरे, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, देवेंद्र आर्या, नितीन गोहणे, रमाकांत लोधे, सूरज गावंडे, विलास टिपले यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

