माजी आमदार सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा : स्नेहपूर्ण वातावरणात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंकडून जानकरांचा सत्कार.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री मा. महादेवराव जानकर यांनी आज सकाळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त सुदृढ आणि मंगलमय आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दोन्ही नेत्यांमध्ये आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. सुभाष धोटे यांनीही जानकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध सामाजिक व राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांनी सन २००९ पासूनच्या आमदारकीच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत सुभाषभाऊंच्या कार्यकाळातील जनतेच्या विकासनिष्ठ कामांची प्रशंसा केली.
ते म्हणाले की, आजही जनमानसात सुभाषभाऊंच्या कार्याची जादू कायम असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुढील काळात निश्चितच घवघवीत यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कौशीब खालीद, राजुरा विधानसभा काँग्रेस समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, जिल्हा महासचिव एजाज अहमद, तालुका उपाध्यक्ष धनंजय चिंचोलकर, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, धनगर समाज तालुका प्रमुख एकनाथ खडसे, तसेच अनंता गोखरे, गोपाल बुरांडे, विठ्ठल येवले, अभिजीत धोटे, कोमल फुसाटे, दिपक खेकारे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, सय्यद साबिर, उमेश गोरे, प्रणय लांडे, संघपाल देठे आदी मान्यवर उपस्थित होते.

