उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कुपवाड परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक तरुणाने विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने स्वतः पोलिसात तक्रार दाखल केली. कुपवाड पोलिसानी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन कुपवाड परिसरातील रहिवासी आहे. त्याच परिसरातील 38 वर्षीय तरुणाने तिच्याशी जवळीक साधली. ‘तुझी घरची परिस्थिती गरिबीची आहे. आई व आज्जी दोघीही कामाला जातात. मी तुला महिना 10 हजार रुपये देतो. तू माझ्या बरोबर येत जा,’ असे सांगत मनाला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला. घटनेनंतर प्रकाराची फिर्याद पीडितेने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

