गणेश धनवडे इंदापूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदापूर:- विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून यामध्ये ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने तयारीत आघाडी घेतली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निमसाखर येथे झालेल्या बैठकीत आपले उमेदवारी मागणी अर्ज शिवसेना जिल्हा प्रमुख संजय काळे व शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्याकडे सादर केले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी २६ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडणार आहेत.
जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमदेवार आणि गट पुढीलप्रमाणे-
भिगवण – शेटफळ गढे गटातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी मदनवाडी गावचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड राहुल पोपट बंडगर यांच्या मातोश्री शशिकला पोपट बंडगर यांनी अर्ज सादर केला.
वडापुरी – माळवाडी जिल्हा परिषद गटातून हिंगणगावचे युवासेनेचे तालुका युवा अधिकारी सचिन बापूराव इंगळे आपला अर्ज सादर केला आहे.
निमगाव केतकी – शेळगाव जिल्हा परिषद गटातून शिरसटवाडीचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड नितीन कदम यांच्या पत्नी प्रज्ञा नितीन कदम यांनी आपला अर्ज सादर केला. तर याच गटातून शिवसेनेचे निमसाखर गावचे युवानेते अरविंद अडसूळ यांच्या पत्नी स्वाती अरविंद अडसूळ यांनीही आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला.
वालचंदनगर – बोरी जिल्हा परिषद गटातून कळंब ( लालपुरी ) गावचे शिवसेना विभागप्रमुख दत्ता खुडे यांच्या पत्नी शिला दत्ता खुडे यांनी आपला अर्ज सादर केला.
सणसर – लासुर्णे जिल्हा परिषद गटातून जाचकवस्तीचे उपसरपंच अरविंद सूर्यवंशी यांच्या पत्नी शोभा अरविंद सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला.
काटी – लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून शेटफळ हवेली गावचे नेते, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी स्वतः आपला अर्ज सादर केला.
तर बावडा – लुमेवाडी गटातून इच्छुक म्हणून वकीलवस्तीचे शिवसेना तालुका समन्वयक अरुण पवार यांच्या पत्नी मनीषा अरुण पवार यांनी आपला अर्ज सादर केला.
तर पंचायत समिती गणांसाठी खालील इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला.
भिगवण पंचायत समिती गणासाठी तक्रारवाडी गावचे शिवसेना उपतालुकाप्रमुख पांडुरंग वाघ यांच्या पत्नी सुवर्णा पांडुरंग वाघ यांनी इच्छुक म्हणून अर्ज सादर केला.
शेटफळ गढे पंचायत समिती गणासाठी मदनवाडी गावचे शिवसेना उपविभाग प्रमुख महादेव सखुंडे यांनी आपला अर्ज सादर केला. त्याच गणातून पिंपळे गावचे माजी उपविभागप्रमुख विशाल यादव यांनीही आपला मागणी अर्ज सादर केला.
पळसदेव पंचायत समिती गणासाठी लोणी देवकर गावचे शिवसेना उपतालुकाप्रमुख अप्पासाहेब डोंगरे यांच्या पत्नी ऋतुजा अप्पासाहेब डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
वडापुरी पंचायत समिती गणातून हिंगणगावचे शाखाप्रमुख तात्या पाटील यांच्या पत्नी रेश्मा तात्या पाटील यांनी आपला अर्ज सादर केला.
निमगाव केतकी पंचायत समिती गणातून निमगाव केतकीचे शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी उमेदवारी मागणी अर्ज सादर केला. तर याच गणासाठी निमगाव केतकी गावातून शिवसेना विभागप्रमुख रणजित बारवकर यांनीही उमेदवारी मागणी अर्ज सादर केला आहे.
शेळगाव पंचायत समिती गणासाठी निमसाखरचे शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी आपला अर्ज सादर केला. तर याच गणातून शिरसटवाडीचे माजी उपसरपंच शिवसेना माजी तालुकाप्रमुख ॲड नितीन कदम यांनीही आपला अर्ज सादर केला.
बोरी पंचायत समिती गणातून कळस गावचे नंदकुमार राजेभोसले यांनी आपला अर्ज सादर केला आहे.
वालचंदनगर पंचायत समिती गणातून कळंबच्या पुजा सचिन तुपे यांनी आपला अर्ज सादर केला.
लासुर्णे पंचायत समिती गणातून बेलवाडी गावचे रमेश संभाजी गायकवाड यांनी आपला अर्ज सादर केला. तर याच गणातून बेलवाडीचेच बाळासाहेब लक्ष्मण मोरे यांनीही आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला.
सणसर पंचायत समिती गणातून सणसर गावच्या सोनाली तानाजी रंदवे यांनी तर कुरवली गावच्या श्रीमती छबाबाई चंद्रकांत जाधव यांनीही आपला अर्ज याच गणासाठी सादर केला.
काटी पंचायत समिती गणातून घोरपडवाडीचे शाखाप्रमुख दत्तात्रय विठ्ठल घोरपडे यांनी आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केला.
लाखेवाडी पंचायत समिती गणातून भोडणी गावचे शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप चौधरी यांच्या पत्नी रुपाली संदीप चौधरी यांनी अर्ज सादर केला. तर याच गणातून इच्छुक म्हणून रेडणी गावचे शिवसेना विभागप्रमुख अभिजीत पाटील यांच्या पत्नी रेश्मा अभिजीत पाटील यांनीही अर्ज सादर केला.
लुमेवाडी पंचायत समिती गणातून नरसिंगपूर गावचे शिवसेना उपविभागप्रमुख अतुल किसनराव घोगरे यांनी आपला अर्ज सादर केला.
वरील सर्व इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती होणार असून त्यानंतर अंतिम इच्छुकांची यादी शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय काळे व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, विभागप्रमुख दत्ता खुडे, विभागप्रमुख अभिजीत पाटील, उपविभागप्रमुख तुषार दळवी, युवानेते अरविंद अडसूळ, रेडणीचे शाखाप्रमुख दत्तात्रय तरंगे, सागर रणवरे, नंदकिशोर गायकवाड, गौरव रणवरे, प्रसाद रणवरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

