छल्लेवाडा येथे मल्हार डान्स व लावणी ग्रुप कार्यक्रमात प्रतिपादन
मधुकर गोंगले उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
दुर्गम भागातील दिन दुबळे जनता आजही विकासाच्या दृष्टीने कोसो दूर आहेत. आजच्या विज्ञान काळात ही दुर्गम भागातील गावाचे समस्या आवासून उभे अश्या दुर्गम गावात व शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे सुविधा उपलब्ध करून गाव विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.स्वातंत्र्यकाळातील ७५ वर्ष लोटूनही आज गावे अंधारात आहेत अश्या दिन दुबळ्या जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहून शासकीय सेवा पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो असे नित्य सहायनी माता चर्च च्या पटांगणावर आयोजित लावणी व डांस कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रतिपादन केले.
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे दिवाळी सणाच्या औचित्य साधून के -स्टार मल्हार लावणी व डान्सग्रुप आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक संरक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव
हणमंतुजी मडावी यांनी होते तर मंचावर ,जि. पं. सदस्य अजय नैताम, माजी पं. समिती सभापती सुरेखा आलाम, माजी पं. सं. सभापती भास्कर तलांडे, गुलाब देवगडे,राजू भाऊ दुर्गे, जेष्ठ समाजसेवक पपय्या चापले माजी ग्रामपंचायत सदस्य विलास बोरकर उपस्थित होते.
पुढे बोलताना कंकडालवार म्हणाले की छल्लेवाडा गाव विस्ताराने मोठा असून येथील शेतकरी वर्ग अतिक्रमण वन शेतीवर जीवन जगत आहेत मात्र त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे तरी संकट ग्रस्त शेतकरी बांधवांच्या मागे मी मदतीस तत्पर आहो आणि वन अतिक्रमण पट्ट्या करिता शासनाकडे पाठपुरावा करू अशी अस्वासन शेतकरी वर्गांना दिले आहे.
कार्यक्रमाचे संचालन सुधाकर कांबळे व आभार रवी झोडे यांनी मानले.
के स्टार मल्हार लावणी व डान्स ग्रुप चे कार्यक्रमाचे आस्वाद घेण्यास बहू संख्येने नागरिक उपस्थित होते.

