स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मिळणार बळकटी.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
आज गडचिरोली येथे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माझ्या प्रमुख उपस्थित गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आयोजित केलेल्या पक्ष सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) गडचिरोली नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, कविताताई पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसुजी पोगाटी, शिवसेनेचे गजानन नैताम व त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा हा पक्ष प्रवेश जिल्ह्याचा राजकारणाला कलाटणी देणारा सोहळा ठरणार आहे. आपला देश हा सर्व जाती – धर्माच्या विचारांनी नटलेला आहे, विविधतेत एकता जोपासणाऱ्या देशात आज सत्ताधारी धर्म आणि जातीच्या आधारे लोकांना झुजवण्याचे काम करत आहे. माणसा – माणसामध्ये दरी निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम सत्ताधारी करत आहे. त्यामुळे अशा निष्ठुर व देश विघातक शक्तीविरुद्ध आपला लढा असून तो समर्थपने आपले नेते राहुलजी गांधी लढत आहे.
राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णतः व्यथित झाला असताना सरकार मात्र शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी कर्जमाफी न करता मीठ चोळण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे सामान्य जनतेने घाम गाळून भविष्यासाठी #LIC च्या माध्यमातून राखून ठेवलेल्या पैसा देशाचे पंतप्रधान मोदी आपल्या उद्योगपती मित्राला वाटत मित्रता जपण्याचे महान कार्य करत आहे.
मी ओबीसीचे अस्तित्व जपण्यासाठी, त्यांचे आरक्षण, हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी नागपूर येथे जो महामोर्चा काढला, त्या मोर्चाचे खच्चीकरण करण्याकरिता एक दिवस अगोदर मला आयकर विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली. जनतेसाठी लढणाऱ्याना नामोहरम करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. असे असले तरी जनतेच्या सर्व प्रश्नांना घेऊन आम्ही सदैव लढत राहणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र सत्ता, सत्तेतून पैसा व याच मदमस्तीत व्यस्त आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदीवासींच्या जमिनी उद्योगपतींच्या घश्यात घालण्यासाठी नियम बदलविले जात आहे. तर खनीज संपत्तीच्या मलिद्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्व घेतले आहे.
फलटण घटनेवरून आज राज्यात कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती झाली आहे हे लक्षात येईल. कोणालाच धाक राहिला नसून रक्षकच भक्षक होत चालले आहे तर सर्व सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा अशा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहविभागाची कार्यप्रणाली जनतेसाठी घातक ठरत आहे.
श्री. लालसू पोगाटी व श्री सुरेश पोरेड्डीवर यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला निश्चितच बळ मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर विजयी ध्वज फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ॲड.कविताताई मोहरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम, सतीश विधाते, गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडवार, हर्षलता येलमुले, श्री. वासेकर, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, मनोहर पाटील पोरेटी, शमशेर खान पठाण, प्रतिक बारसिंगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

