युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- कळमेश्वर येथील बाजार चौकामधील कळमेश्वर हे एक शहर एका सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित होईल त्याचप्रमाणे येथील हातमाग व्यवसाय यांच्या माध्यमातून हे शहर जगाच्या नकाशावर येईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते कळमेश्वर शहरातील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक 289 वरील रेल्वे उड्डाण पुलाच्या तसेच वन टाइम अंतर्गत कळमेश्वर मधील अंतर्गत रस्त्याचे दुभाजकामस सुधारणा या प्रकल्पाची परवानगी शुक्रवारी गडकरी च्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अर्थ राज्यमंत्री अँड आशिष जैस्वाल आमदार कृपाल तुमाने आमदार आशिष देशमुख माजी आमदार सुधाकरराव कोहळे अशोक मानकर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे डॉ. राजीव पोतदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी आर पी सिंग प्रकल्प संचालक सि सिन्हा उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की धापेवाड्यामध्ये टेक्सटाईल कलास्टर तयार झाले असून या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन हात मागावरील साड्या तयार होत आहे. त्याच प्रमाणे हात मागायला चालला जर कळमेश्वर शहराला मिळाली तर कळमेश्वर तसेच धापेवाडा हे हातमागच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर येथील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कळमेश्वर चालू केले सुद्धा दूध उत्पादनामध्ये पुढाकार घेणे आवश्यक असून बुटीबोरी येथील मदर डेरी च्या प्रकल्पाच्या माध्यमातून कळमेश्वर मधील दूध उत्पादकांना फायदा मिळू शकतो असे गडकरी यांनी यावेळी नमूद केले या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज देवके दिलीप धोटे प्रमोद हत्तीअजयबोरे धनराज मंडलिक कैलास बांबल प्रकाश वरुडकर सचिन रघुवंशी दिलीप धोटे मीना तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

