गणेश धनवडे इंदापूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदापूर:- तालुक्यातील मानकरवाडी येथील श्री छत्रपती हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला.इ १० वी च्या वर्गातील सन १९९८-९९ च्या मेळाव्यास २५ वर्षांनंतर अनेक जुने विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारातुन विद्यार्थीनी आत येत मैदानावर जाऊन प्रार्थना घेतली. माजी विद्यार्थी यांनी संकलित केलेल्या निधीतून शाळेच्या स्टेजसाठी मदत शिक्षकांना देण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव रुपनवर यांनी इयत्ता १० वीच्या वर्गात तास घेत स्मशानांतंल सोनं पाठ शिकवला. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांना भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रमेश मचाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव रुपनवर, भागवत घुले इ मान्यवरांनी सामाजिक कर्तव्यबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी विपुल पाटील यांनी शालेय जीवनातील गुरुजन, सहकारी मित्र मैत्रीण यांच्या वर्गातील आठवणीना उजाळा दिला.
या कार्यक्रमासाठी श्री छत्रपती हायस्कूल भवानी नगर शाळेचे मुख्याध्यापक रमेश मचाले, उपमुख्याध्यापक प्रकाश कोळेकर, उपशिक्षक सतीश मानकर, सुनील आदलिंग, हेमंत मासाळ, डी सी कोळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाथाजी माने, नामदेव खांडेकर, सुनील सर्जे, पुंडलिक सोनवणे, भागवत घुले, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक विजय कांबळे, बळीराम निकम, सेवानिवृत्त उपशिक्षक हनुमंत ढेकळे, अशोक लोंढे, रवींद्र पलंगे, अशोक देवकर, जी बी भोसले, शिक्षकेतर कर्मचारी बापू दणाणे, ज्ञानदेव पवार, प्रल्हाद गायकवाड उपस्थित होते.
हा माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी गणेश निंबाळकर, आण्णा इंगळे, विनोद थोरात, अविनाश अनपट, सचिन गायकवाड, अविनाश रिटे, राजेंद्र गायकवाड, सुषमा तावरे, संगिता चव्हाण, जगदीश कणसे, महादेव गायकवाड यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप पवार व आभार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले.

