मधुकर गोंगले उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी ==
अहेरी शहरातील बेघर कॉलनी मधील निवासी पट्टे तसेच घरकुल बाबतची समस्या घेऊन 2 दिवसापूर्वी तेथील नागरिकांना सोबत घेत भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरी नगरपंचायत गाठले होते, त्याची त्वरित दखल घेत दुसऱ्याच दिवशी मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेबांनी ऑन दि स्पॉट.. जाऊन बेघर कॉलनीतील नागरिकांशी थेट संवाद साधला, निवासी पट्टे, घरकुल, स्वछता, पिण्याचे पाणी तसेच पथदिवे ह्या सर्वच विषयावर सविस्तर चर्चा करीत प्राधान्यक्रमाने सर्वच समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ह्यावेळी C.O. साहेबांनी दिले..!!
अहेरी नगरपंचायत स्थापण होऊन तब्बल 10 वर्ष पूर्ण झाले असूनही बेघर कॉलनी आजपर्यत अनेक नागरी सुविधेपासून वंचित होती, नगरसेवकाने ह्या समस्या लक्षात आणुन देताच त्याची त्वरित दखल घेत बेघर कॉलनीला भेट देणारे गेल्या 10 वर्षातील पहिले मुख्याधिकारी गणेश शहाणे साहेब असल्याने बेघर कॉलनीतील नागरिकांनी त्यांचे कौतुक करीत आभार मानले आहे.

