कार्यक्रमाचे अध्यक्षा आयुष्यमती श्यामला राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*देसाईगंज*
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे ७६व्या संविधान दिवस निमित्त प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यात अमुलाग्र सकारात्मक झालेला बदल विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत यावर विचार मंथन करण्यात आले.भगवान बुध्द व डॉ, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर सामूहिक वंदना करण्यात आली व संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ घेण्यात आली.यावेळी विचार मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.अध्यक्ष स्थान श्यामला राऊत.उद्घाटक कल्पना कापसे लोकमत सखी मंच संयोजिका देसाईगंज ,सह-उद्घघाटक ममता जांभूळकर,तर विशेष अतिथी रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम,कविता मेश्राम ,गायत्री वाहाने यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.प्रास्ताविक सरीता बारसागडे, संचालन जयश्री लांजेवार तर आभार प्रदर्शन सुजाता रामटेके यांनी केले.कार्यक्रमाला लीना पाटील,जीजाताई सहारे,कल्पना गोवर्धन, प्रतिभा बडोले, रश्मी गेडाम यांनी सहकार्य केले.

