संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवार ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामनवाडा येथे भारतीय संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सौजन्यांने गावात संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी विविध घोषवाक्य तसेच फलकांदाद्वारे नागरिकांमध्ये संविधाना विषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संविधान दिन कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी धर्मुभाऊ नगराळे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय मार्गदर्शनात सौ.भारतीताई पाल यांनी संविधानाचे महत्व सांगून न्याय, बंधुता, समता, समानता अधिकार व कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व पाहुणे मंडळी व विद्यार्थ्यांनी संविधान सेल्फी पॉईंट जवळ उत्साहाने सेल्फी काढली व संविधानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संविधान दिनानिमित्त माजी विद्यार्थी संघाचे सदस्य अंकुश पर्रेकर, दुर्वास मुन व सौ. उषा नगराळे यांच्या कडून विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे पाटप करण्यात आले. उपाध्यक्ष सन्नी कांबळे यांच्या तर्फे खाऊ देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. भारतीताई पाल, सरपंच बामणवाडा ह्या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष धर्मुभाऊ नगराळे, उपाध्यक्ष सनी कांबळे, कोषाध्यक्ष आक्रोश जुलमे, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य दुर्वास मुन, अंकुश वाघमारे, राकेश वाघमारे, सौ उषा नगराळे, शालू आत्राम, पौर्णिमा घडले, अंकुश वाघमारे, संदीप आत्राम, दीपक नगराळे, प्रतिष्ठित नागरिक भाऊजी पाल, सौ शशिकला तावडे अंगणवाडी शिक्षिका, प्रमोद नगराळे, अभय नगराळे, जगदीश पाल व देविदास टेकाम हे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव यांनी केले शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

