Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नागपुरात घडलं भीषण कांड: पाच वर्षांचा प्रेमसंबंधावाचा खुनी अंत: प्रेमिकेनी केली प्रियकराची निर्घुण हत्या, मग चाकूने वार..!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2025
in Uncategorized, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात घडलं भीषण कांड: पाच वर्षांचा प्रेमसंबंधावाचा खुनी अंत: प्रेमिकेनी केली प्रियकराची निर्घुण हत्या, मग चाकूने वार..!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक (नागपूर)

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमिकेने आपल्या प्रियकराची चाकूने वार करत निर्घुण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक प्रियकराने आपल्या प्रेमिकेकडे लग्नाचा तगादा लावला होता त्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मृत प्रियकर बालाजी कल्याने

आपल्या प्रियकराची निर्घुण हत्या केल्या नंतर आपल्या गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून प्रेयसीने स्वतःच्या शरीरावर चाकूने वार करून हल्ल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशी केल्याने प्रेमिकेनेच आपल्या प्रियकराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बालाजी कल्याने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाच वर्षांचा प्रेमसंबंधावाचा खुनी अंत: नांदेड जिल्ह्यातील नातेवाईक असलेले प्रियकर आणि प्रेयसी नागपूरमध्ये रोजगार आणि शिक्षणासाठी आले होते. यातील आरोपी प्रेमिका ही बीएएमएसच्या शेवटच्या वर्षाला होती. मृतक बालाजी हा पोलीस भरतीसाठी तयारी करत होता, दोघांचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांत प्रियकराने प्रेयसीला लग्नाचा तगादा लावला. प्रेयसीच्या वडिलांना फोन करून लग्न लवकर लावून द्या, अन्यथा माझ्या पार्थिवाच्‍या दर्शनासाठी तुम्हाला नागपूर यावं लागेल, अशी धमकीही दिली होती. यामुळे प्रेयसी त्याच्यावर संतापली होती.

रूममधून ओरडण्याचा आवाज पण रूम बंद: बुधवारी रात्री आरोपी प्रेमिका प्रियकराच्या रूममध्ये आली. बालाजी आणि त्याचा रूम मित्र तिघांच्या पण रात्री उशिरा पर्यंत गप्पा चालल्या. त्यानंतर बालाजी आणि आरोपी प्रेमिका रूममध्ये गेले. काही वेळानंतर रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज आला. मृतकाच्या मित्राने रूमचा दरवाजा ठोठावला मात्र प्रेयसीने दरवाजा उघडला नाही. 20 मिनिटांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेपण रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडून असल्याचं दिसलं. त्यानंतर मित्राने घरमालकाच्या मदतीने या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बालाजी याला तपासून मृत घोषित केले तर जखमी प्रेमिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसी खाक्या आणि प्रेयसीने दिली हत्येची कबुली: या घटनेची माहिती नंदनवन पोलिसांना मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. प्रियकराच्या अंगावर चाकूच्या खोल जखमा होत्या. दोघांमध्ये वाद झाला असावा यातून प्रियकराची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आला. आपलं बिंग फुटू नये म्हणून प्रेमीकेने प्रियकराने माझ्यावर हल्ला करत स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा बनाव केला. प्रेयसी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिच्यावर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी सुरुवातीला तांत्रिक तपास केला. मात्र प्रियकराच्या शरीरावर असणाऱ्या खोल जखमांमुळे पोलिसांना दाट संशय प्रेयसीवर होता. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यावर प्रेयसीने हत्या केल्याची कबुली दिली.

आपल्याच प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेमीकेवर नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस ताब्यात घेतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेली पाच वर्षे प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीकेने अशा प्रकारे आपल्या प्रियकराची हत्या केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी मयत प्रियकर बालाजी याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रेयसीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #Lover murder#Nagpur Live#Nagpur murder#Nagpur news#nagpur police#हत्या
Previous Post

न्यू स्टार बौध्द मंडळ राजारामच्या वतीने विश्वरत्न,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिन.

Next Post

युवकांसाठी रोमांचकारी हॉलीबॉल स्पर्धा.. सुरजागड इस्पात आणि मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनाचेरपलीमध्ये संयुक्त उपक्रम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
युवकांसाठी रोमांचकारी हॉलीबॉल स्पर्धा.. सुरजागड इस्पात आणि मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनाचेरपलीमध्ये संयुक्त उपक्रम.

युवकांसाठी रोमांचकारी हॉलीबॉल स्पर्धा.. सुरजागड इस्पात आणि मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनाचेरपलीमध्ये संयुक्त उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In