मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनाचेरापल्ली येथील स्थानिक युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये खेळभावना वाढवण्यासाठी एक रोमांचक व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात आयोजित करण्यात आली. Surjagad Ispat Pvt. Ltd. आणि MIAM Charitable Trust यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण संधीचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेला परिसरातील नागरिक आणि व्हॉलीबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. निरंजन दुर्गे (पोलीस पाटील चिंतनपेठ तथा वडलापेठ) यांनी जबाबदारी सांभाळली, तर लक्ष्मी नैताम आणि सविना पागडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवर अतिथींनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली:रोहित तर्रेवार,रेणुका आत्राम (सरपंच), मधुकर आत्राम, महेंद्र ईष्टम, मुंडरे साहेब (ग्रामसेवक),सत्तु पेरकी, संतोष आत्राम, जय सेवा व्हॉलिबॉल मंडळ या व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे युवकांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले, तसेच Surjagad Ispat आणि MIAM Charitable Trust ने सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल समस्त गावकरी मंडळींनी त्यांचे विशेष आभार मानले.

