PWD विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांचा लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* अहेरी विधानसभा क्षेत्राचे मुख्यालय तथा राजनगरी अहेरीच्या मुख्यरस्त्याची सुमारे पाच वर्षांपासुन प्रचंड दुरावस्था झाली होती. बर्याच प्रतिक्षेनंतर दोन वर्षांपुर्वी तत्कालीन कॅबीनेट मंत्र्यांनी रस्तादुरुस्तीच्या कामाचे भुमीपुजन करुन फलकाचे अनावरण केले होते मात्र त्याचा खुप गाजावाजा देखील झाला. प्रत्यक्षात मात्र काम सुरु झाले नाही.कालांतराने त्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले परंतु शब्दशः कासवगतीने काम सुरु होते. दोन दिवस काम प्रगतीपथावर असल्याचे दर्शवुन अगदी थोडेसेच काम करुन महीने दोन महीने खंड पडायचा. पुढे काम सुरु होते पर्यंत पुर्वी केलेले काम देखील मातीमोल व्हायचे. दोन वर्षात त्याच दुरुस्तीकामाचे पुन्हा पुन्हा भुमीपुजन झाले परंतू काम निम्मे देखील झाले नाही. रस्त्याच्या दुरावस्तेमुळे वाढते अपघात आणि धुळीचा प्रचंड त्रासाने नागरीक बेजार झाले. आठवड्यापुर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभीयंत्यांचे कार्यालय गाठुन तात्काळ काम सुरु करुन लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावे अशी मागणी केली आणी तसे न घडल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आठवडा लोटत असुनही सार्वजनीक विभागातर्फे काहीच हालचाल होत नसल्याचे बघुन आज माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अहेरीच्या मुख्यचौकात चक्का जाम आंदोलन केले. सुमारे दिड तास आंदोलन सुरु असल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबलेली होती.अहेरी शहरातील मुख्य रस्त्याची खड्डेमय अवस्था, नागरिकांचे हाल, सततचे अपघात आणि व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान या गंभीर परिस्थितीचा निषेध नोंदवत आज नागरिक, व्यापारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसागर रस्त्यावर उतरला.
कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तात्काळ काम सुरु करुन तिन महीण्यात पुर्ण होईल असे लेखी आश्वासन दिले आणि तसे न घडल्यास पुन्हा अधिक तिव्र इशारा देऊन आंदोलन थांबविण्यात आले.

