मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.२९ एप्रिल १९५४ ला बाबासाहेबांचे पदस्पर्श लाभलेल्या दीक्षाभूमी देसाईगंज येथे मान्यवरांनी व तालुक्यातील नागरीकांनी कडाक्याच्या थंडीतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली.सकाळी निळा झेंडा अर्ध्यावर उतरवून श्रध्दांजली देण्यात आली.तर संध्याकाळी पाहूण्यांच्या हस्ते निळा झेंडा पूर्व स्थितीत करण्यात आला.विविध वार्डातील कॅन्डल मार्च चे संध्याकाळी ७. वाजता पासून आगमन झाले बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक वंदना पश्चात दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक मा.रामदास मसराम साहेब, आमदार आरमोरी नि.क्षेत्र यांनी बाबासाहेबांनी भारतासाठी लिहिलेलं संविधान अंगिकारुन अनेक बहुजनांनी प्रगती केली व पुढेही करतील असे म्हटले.तर प्रमुख वक्ते संतोष टेंभुर्णे सर यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्या सांगितलेल्या मार्गाचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे असे सांगितले.अध्यक्षिय भाषणात इंजि.विजय मेश्राम यांनी कट्टरता ही सर्वच धर्मांकरिता घातक आहे असे प्रतिपादन केले. तर दुलीचंद राऊत सरांनी माईसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज यांनी तालुक्यातील नागरीकांच्या सहकार्याने आयोजित केला.प्रास्ताविक सरीता बारसागडे, संचालन जयश्री लांजेवार तर आभार समितीच्या अध्यक्षा ममता जांभूळकर यांनी केले.कार्यक्रमाला समितीच्या सचीव श्यामला राऊत, उपाध्यक्ष रत्नमाला बडोले व यशोदा मेश्राम, कोषाध्यक्ष कविता मेश्राम,सल्लागार मारोती जांभूळकर सर तसेच संजय मेश्राम,चंदूराव राऊत,विद्या लोखंडे, गायत्री वाहाने, सुनिता नंदागवळी, आशा रामटेके, लीना पाटील,जीजा सहारे यांनी सहकार्य केले.

