आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थीचा सहभाग. वनपरीक्षेत्र कार्यालय, राजुरा (प्रादे.) यांचा पुढाकार.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
राजुरा:- मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु, व अमोल गर्कल, उपविभागीय वनधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात, एस. डी. येलकेवाड, वन परिक्षेत्र अधिकारी, राजुरा यांच्या पुढाकारातून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या विध्यार्थीना मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर, वनपरीक्षेत्र कार्यालय, राजुरा (प्रादे.) यांच्या वतीने जोगापूर वन पर्यटन येथे वनभ्रमंती, पक्षी निरीक्षण, वन्य प्राण्यांच्या अधिवासाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले, पी. आर. मत्ते, क्षेत्र सहाय्यक राजुरा, एन. के.देशकर, क्षेत्र सहायक, विहीरगाव, वनरक्षक एस. वि. मेश्राम, डी. आर. शेंडे, एस. व्ही. गज्जलवार, एस. आर. हाके , ए. एन. पोले, एस. डी. सूर्वेसे , रोपवन चौकीदार नरेंद्र निखाडे, मयूर आत्राम, वनमजूर हरिभाऊ बेसूरवार, प्रभाकर टेकाम यासह वनरक्षक, वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वन भ्रमंती करताना वाघ आणी अस्वल या वन्य प्राण्याच्या पाऊलखुणा (पग मार्क) आणी अस्वल गुफा, हरणांच्या कळपाने विध्यार्थीचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डी. आर. शेंडे, वनरक्षक यांनी केले. तर आभार एस. व्ही. गज्जलवार, वनरक्षक यांनी मानले. उपस्थित विध्यार्थीना क्षेत्र सहायक एन. के. देशकर व पी. आर. मत्ते यांनी मार्गदर्शन करीत प्रत्यक्ष संवाद साधला. मानव -वग न्यजीव संघर्ष टाळण्याकरिता विध्यार्थीनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करावी असे आवाहन करण्यात आले.

