मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगर परिषद ने अंतिम मतदार यादी दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 06 चे एकुण मतदार हे 4382 इतके होते. तर 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान झाल्यावर प्रशासन तर्फे जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये एकुण मतदार 4400 इतके आहे. या चुकीमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाली आहे. लवकरात लवकर ही चुक दुरुस्त करुन सुधारीत (PDF) यादी पुन्हा जाहीर करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
त्यानंतर लगेच निवडणूक अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यामध्ये लक्षात आले की नगर पालिका प्रशासनातर्फे जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आकडे सारखे आहे पण निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर ही चुक कायम आहे ही बाब फार गंभीर असुन सुधार करण्यात यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मेल व्दारे त्यांना विनंती करु अशी ग्वाही दिली.
नगर पालिका निवडणुकी साठी 2 डिसेंबरला मतदान झाले. आता निकाल 21 डिसेंबर ला जाहीर होणार आहे. त्या आधी संपूर्ण हिंगणघाट मधील उमेदवारांना माझी विनंती आहे की आपापल्या प्रभागातील आकडेवारी तपासुन घ्यावी व काही तफावत आढळल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करावी.

