मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगरपरिषद मध्ये सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले शेख रहमान पटेल त्यांचे नाव शेख रहमान असले तरी ते मालगुजार पाटील असल्यामुळे लोक त्यांना पटेल म्हणायचे. एकूण 27 वर्षे हिंगणघाट नगरपालिका मध्ये नगरसेवक होते. दीर्घकाळ नगरसेवक राहून त्यांनी जनसेवा केली. सेवाभाव आणि सर्वधर्मसमभाव ही त्यांची वृत्ती होती त्या काळातील ते अत्यंत दानशूर व्यक्ती म्हणून हिंगणघाट शहरामध्ये त्यांची ख्याती होती.
1920 च्या दशकात ब्रिटिश सरकार तर्फे त्यांना मानद दंडाधिकारी ( Honarary Magistrate) म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांचा नियुक्ती नंतर त्यांना ब्रिटिश प्रशासना तर्फे शुभेच्छा संदेश देण्यात आला. मानद दंडाधिकारी म्हणून न्याय निवाडा करण्याचे कार्य त्यांचाकडे होते. त्याकाळी हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही 12 हजाराच्या जवळपास होती मानद दंडाधिकारी हे पद पगारी नसून मानद होते समाजातील सर्वात उच्च प्रतिष्ठित व्यक्तीलाच हे पद दिल्या जात असे. मानद दंडाधिकारी हे न्याय विभागाचे अधिकारी मानले जात असे.
त्यांना देण्यात आलेला हा संदेश साधारण नव्हता तर एका छोट्याशा तांदळाचा दाण्यावर हा संदेश लिहून देण्यात आला. संदेश लिहिण्याचे काम दिल्ली येथील Museum Darulfalah, Sadar Bazar Delhi यांनी केले आहे ऑर्डर क्र. 13805. ब्रिटिश प्रशासनातर्फे खास लोकांसाठी खास प्रकारचे संदेश तयार करण्यात आले होते, त्यामध्ये हिंगणघाटचे दिवंगत शेख रहमान पटेल यांचा समावेश होता. या तांदळाचा दाण्यावर 112 अक्षरे लिहिण्यात आली. तांदळाच्या दाण्यावर हि अक्षरे खालील प्रमाणे आहे.
“May God bless a long, happy and prosperous life to Janab Shaikh Rahman sahib Honorary Magistrate, Hinganghat, Wardha (British India ).”
हा संदेश लिहिलेला तांदळाचा दाणा एका वॅक्स लावलेल्या काचेचा ट्यूब मधे टाकून, ती ट्यूब स्टीलच्या डबी मध्ये टाकून, ती डबी खरड्यात पॅक करून त्यावर पेन ने Janab Shaikh Rahman Sahib लिहिण्यात आले, या सोबत तांदळाच्या दाण्यावर लिहिलेले बारीक अक्षरे वाचण्यासाठी एक magnifier glass सोबत देण्यात आला, या सर्व वस्तू ठेवण्यासाठी अत्तराच्या कुप्या ठेवण्यासाठी ज्या प्रमाणे मंजुषा असते तशी लाकडी पेटी त्यावर मखमली कापडाचे अस्तर लागलेले. या प्रकारे हा शुभेच्छा संदेश देण्यात आला या शुभेच्छा संदेशाला आज शंभर वर्ष झाली आहे आजही त्या तांदळाचा दाण्यावरील संदेश सहज वाचता येतो. हा Wandarful Rice संदेश जबाब शेख रहमान पटेल यांचे पणतू अरशाद पटेल आणि अवेश पटेल यांनी आपल्या दानशूर पणजोबाची आठवण म्हणून सांभाळून ठेवला आहे.
मोबाईलने घेतलेल्या फोटो मध्ये भाताचा दाणा त्यावरील लिहिलेला संदेश दिसत आहे. तांदळाचा दाण्यावर सूक्ष्म अक्षरे लिहिण्याची कला यात दिसत आहे. भारताबाहेर मध्य आशिया आणि इराण मध्ये हि कला विकसित झाल्याची माहिती आहे. तांदळाचा दाण्यावर श्लोक, आयते, शुभ वाक्य लिहिण्यासाठी अत्यंत बारीक साधनांचा वापर केला जात असे. वरील Wandarful Rice हे संग्रहालय स्तरीय नमुना असून विलक्षण कौशल्य वापरून 112 अक्षरांचे बारीक लिखाण करण्यात आले आहे.
भाताचा दाणा व त्यावरील लिखाण सुरक्षित ठेवण्यासाठी हवाबंद काचेची ट्यूब त्यावर कॉर्क चे पॅकबंद झाकण लावण्यात आले आहे. हि काचेची ट्यूब सुरक्षित ठेवण्यासाठी लांब सिलेंडर सारखी स्टील ची डबी (Steel speciman storage case) वापरली आहे. दाण्यावरील सूक्ष्म अक्षरे वाचण्यासाठी भिंगाचा काच (mini magnifier glass) या काचेचा लेन्सचा सहाय्याने हि अक्षरे वाचता येते, अन्यथा साध्या डोळ्यांनी वाचता येत नाही या कलेला ” Micro Calligraphy on Rice Grain ” म्हणतात. हा तांदळाच्या दाण्याचा सेट संग्रहालयातील नोंदीसह असल्याने अत्यंत दुर्मिळ आहे. हे तंत्र मायक्रोकॅलिग्राफी इतिहासाशी संबंधित असून हि कला आता लुप्त होत आहे.
शंभर वर्षा नंतर सुद्धा या तांदळाच्या दाण्यावरील लिहिलेलं मजकूर वाचता येतात बनवणाऱ्याचे नाव, नमुन्याचा क्र. सर्व स्पष्ट वाचता येते, त्यामुळे हि संग्रहालय स्तरीय श्रेष्ठ पुरातत्ववीय वस्तू Antique ठरते. शंभर वर्षा पूर्वीची अशी सुष्म कलात्मक वस्तू मिळणे अवघड आहे.
मोबाईलचा मदतीने तांदळाचा दाण्याचा फोटो घेतला आहे त्यामुळे फोटोतील अक्षरे वाचायला थोडी कठीण जाईल परंतु अक्षरे कोरली आहे हे स्पष्ट दिसत आहे. यावेळी प्रविण कडू (हिंगणघाट भूषण) यांच्यासोबत मिलिंद दीक्षित, समीर बक्श, प्रशांत भोयर, डॉ. सतीश नक्षिणे, सुधाकर डबले यांनी या ऐतिहासिक Wandarful Rice चे निऱीक्षण केले आहे.

