सामाजिक कार्यकर्ते संजय गज्जलवार व शाळेतील शिक्षका कडून आर्थिक मदत करण्यात आले.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येतील आश्रम शाळेत शिकत असलेला दहावीचा विध्यार्थ्याचा घरीच विद्युत शाक लागून जागीच मृत्यू झाला. श्रीकांत विकास मडावी वय (17) रा. येदरंगा असे मृत पावलेला विध्यार्त्याचे नाव असून सदर विध्यार्थी हा दिनांक 16/12 ते 17/12/25 असे दोन दिवसाची सुट्टी चा अर्ज शाळेत टाकून घरी गेला होता. दरम्यान आज 18 तारखेला दोन वाजे दरम्यान घरी तो टार्च चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पिन करंट बोर्ड मध्ये न लावता सोलर इन्वर्टर वर डायरेक्ट लावला होता, त्यामुळे विद्युत शाक लागून बेसुद्ध झाला असता त्याला लगेच जवळच्या जिमलगट्टा प्राथमिक दवाखान्यात आणले असता डाक्टरांनी मृत घोषित केला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे पुढील कारवाईस पोस्टमाडम करिण्या साठी पैसे नसल्याने नेत नसल्याचे सांगितले, लगेच सामाजिक कार्यकर्ते संजय गज्जलवार यांनी आर्थिक मदत करून ऍम्ब्युलन्स ची सोय करून दिली. यावेळी आश्रम शाळेचे शिक्षकांनी भेट देऊन कुटुंबाची तसेच घटनेची माहिती घेतली, तसेच आश्रम शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद कडून आर्थिक मदत केली यावेळी मुख्याध्यापक शॅलेंद्र कावळे, शिक्षक कोडापे, कुसराम, डोके, इस्थाम, मडावी, चकणारपू, इष्टम मॅडम आदी उपस्थित राहून घटनेची माहिती घेतली.
कोट – श्रीकांत विकास मडावी हा दहावीत शिकत असून तो 16व 17 तारखेचा दोन दिवसाची सुट्टी चा अर्ज टाकून घरी आला होता.आज शाळेत येणार होता पण आज आला नाही, दरम्यान घरी ही घटना झाली. मुख्याध्यापक शॅलेंद्र कावळे.. आश्रम शाळा जिमलगट्टा.

