उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील ईश्वरपूर येथे 8 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्या त्यानंतर या नराधमांनी तिला निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर सोडून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ईश्वपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना बेड्या ठोकल्या आहे. या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर चालत होती पीडिता: पीडित अल्पवयीन मुलगी ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8 व्या वर्गात शिक्षण घेते. ती आपल्या आई बरोबर राहत असून मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान ऋतिक महापुरे याने पीडित अल्पवयीन मुलीला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावले. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकी मोटर सायकल वरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी मुलीने विरोध केल्याने तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करत दोघांनी तिला निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत असताना काही लोकांच्या ती दिसली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि याबाबत ईश्वरपूर पोलिसांना माहिती दिली.
नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल: घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी पीडितेला माहिती तिला ताब्यात घेत चौकशी केली असता हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन नराधमाना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

