संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय महिला हिंसाचार प्रतिबंधक समिती चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा स्वाती प्रदीप देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्याने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेतील वाचनालयाला स्काउट्स गाईड्स, समाजसुधारक, क्रांतिकारकांची जीवनचरित्र पुस्तके भेट दिली तसेच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना पेन्सिल, शॉपणर, खोटरवर असलेली किट भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून प्रदीप देशपांडे यांची उपस्थिती होती. तर आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, स्काऊट मास्टर रूपेश चिडे, गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, नेफडो चे युवा उपाध्यक्ष रवी बुटले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्वाती देशपांडे यांना सामाजिक, धार्मिक कार्यात विशेष आवड आहे. त्यांनी अनेक उपक्रम, कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती केली आहे. वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण असून तो अविस्मरणीय करावा याकरिता आपण सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे शैक्षणिक साहित्य व वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महिला हिंसाचार प्रतिबंधक समिती च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

