प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील चाणकी कोपरा पिंपळगाव शिवारात वाघ दिसून आल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी वन विभागाला मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल नाकतोडे यांच्या शेतात चण्याला पाणी ओलण्याकरिता गेलेल्या शेतकरी देविदास दाते यांना रात्रीं 9 वाजताच्या सुमारास शेतात पट्टेदार वाघ दिसला असताच त्यांनी गावांकडे धाव घेतली आणी गावातील लोकांना वाघ दिसला म्हणून सांगीतले तसेच पिंपळगाव येथील नागरिकांनी काँग्रेसचे नेते अतुल पन्नासे यांना फोन करून हि माहीती दिली.
त्यानंतर अतुल पन्नासे यांनी लगेच वन विभागाला याबाबत कळवले. त्यानंतर वनरक्षक सुनिल डाखोळे आणि अतुल पन्नासे सेलू तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष यांनी लगेच वेळ न घालवता पिंपळगाव येथे पोहोचलेत व सर्व झालेली घटना समजून घेतली आणि याची सर्व माहिती वन विभागाचे वनरक्षक डाखोळे यांनी वरिष्ठ अधिकारी यांना कळवतो आणि याबाबत उपयोजना करतो असे सांगितले.

