🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- नाशिक- नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा रुग्णालयात येथे जखमी प्रवाशांची भेट घेतली. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू तर ४१ प्रवासी जखमी झाले आहे. या बसमध्ये एकुण ५३ प्रवाशी होते. प्रवाशाची क्षमता ३० असतांना या बसमध्ये २३ प्रवाशी अतिरिक्त होते.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

