मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी – अहेरी पंचायत समिती अंतर्गत जि . प . उ . प्राथ.शाळा , रेपनपल्ली ( जू ) येथे कार्यरत पदवीधर प्राथमिक शिक्षक . डॉ . सखाराम अंकुलु झोडे यांना ” भारत गौरव सन्मान आणि आचार्य पदवी ” हा मानाचा पुरस्कार सुंदरय्या विज्ञान भवन , हैद्राबाद येथे आचार्य पदवीदान समारंभात सन्मानित करून बहाल करण्यात आला आहे
सदर पदवीदान समारंभात लोसियांना विद्यापीठाच्या प्रमुख मा . अनु भारद्धाज मॅडम होते तसेच प्रा. डॉ . मनमोल डोळ , कर्नाटक , डॉ शिमा गंगाराम तेलंगाना , प्रा . डॉ . बिटलू प्रभाकर , डॉ . गोपाल बामण डॉ रमेश दिवाकर आदिच्या प्रमुख उपस्थित आचार्य पदवी प्रदान करणात आले आहे .
डॉ . सखाराम अंकुलु झोडे आपले शैक्षणिक कार्य करतांना देखील मानव कल्याणकारी , वंचितांच्या सर्वांगिण विकासाठी , समस्त बहुजन समाजाला जागृत करण्याचा महानिय विशेष गरीब व आदिवासीच्या उत्थानाच्या कार्याबद्दल हा बहु मानाचा सन्मान बहाल करण्यात आला आहे.
एकंदर सामाजिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात डॉ. सखाराम अंकुलु झोडे यांचा फार मोठी उल्लेखनिय कामगिरी आहे नक्कीचा सन्मानाने परिसरातील युवा पिढीला प्रेरणा व नव विचार परिवर्तनास चालना मिळेल . या बद्दल परिसरातील नागरीकां कडून अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे .

