रोहयो सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य यांची निवेदनातुन मागणी.
*अहेरी ==*
:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन मागण्या मंजुर करण्यात यावे अशी अहेरी चे आमदार, माजी राज्यमंत्री डॉ राजे धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या अहेरी तील निवासस्थानी त्यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत, सन 2008 ते आजतागायत आम्ही कंत्राटी कर्मचारी (APO, TPO, CDEO, MIS. PMO) या पदावर तुटपुंज्या मानधनावर शासनाने नेमून दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदारीची कामे प्रामाणिकपणे पार पाडीत आहोत परंतु आजपर्यंतच्या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हां कंत्राटी कर्मचारी यांची सततची पिळवणुक होत असल्याचे आम्ही कंत्राटी कर्मचारी शासनाचे निदर्शनास आणून दिलेले आहे. परंतु शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे कंत्राटी कर्मचारी यांचे बाबतीत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आम्हा सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या वर अन्याय होत आहे.
निवेदनातुन केलेल्या मागण्या
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विभागात किमान 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचारी यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात यावे,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विभागात आज रोजी पर्यंत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना वयाचे 60 वर्ष पर्यंत जॉब संरक्षण देणेबाबतचे शासन निर्णय निर्गमित करुन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पद निहाय आकृतीबंध तयार करण्यात यावे असे मागणी निवेदनातून केली आहे
माजी राज्यमंत्री राजे डॉ धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देताना अहेरी पंचायत समिती रोहयो विभागाचे सहा. कार्यक्रम अधिकारी नेहरू गोवर्धन,तांत्रिक अधिकारी नागेश शेनीगारपू,मनोज पडीशेलवार, व्येंकटी कावरे, श्याम गोलकोंडा,डेटा कम क्लर्क खुशाल कंकनालवार,जरीना शेख, आदी रोहयो चे कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

