“दुर्गम भागाचा कायापालट करणार; शिक्षण आणि आरोग्यावर आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा विशेष भर.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आज कमलापूर परिसराचा झंझावाती दौरा करून विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना, “क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, नागरिकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर: सभेत बोलताना आमदार आत्राम म्हणाले की, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांच्या सक्षमीकरणावर आपली विशेष नजर असून, या विभागांच्या प्रगतीसाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आगामी काळात या परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत: आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे कमलापूर येथे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही घोषणाबाजीने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. नागरिकांच्या या प्रेमाबद्दल आत्राम यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती: *सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.* याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, रवींद्र ओल्लालवार, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, रियाझ शेख, माजी बांधकाम सभापती इंदरशा मडावी, सरपंच रजनीता मडावी, अरुण मुक्कावार, माजी सरपंच सांबाया करपेत, माजी पंचायत समिती सदस्य मांतय्या आत्राम, वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे,संतोष बोम्मावार, कैलास कोडापे,दिनेश अरगेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

