आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते धनादेश वितरण.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
:- अहेरी तालुक्यातील खांदला (राजाराम) येथील शिवराम बामनकर यांचा वाघाच्या हल्ल्याने मृत्यू झाला होता.
राजाराम उपक्षेत्र चिरेपली बिठात शिवराम बामनकर यांनी नेहमी प्रमाणे 24 सप्टेंबर च्या सकाळ च्या सुमारास गाई चराई साठी जंगलात गेल्याने जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखी शिवराम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता यात शिवराम गंभीर जखमी होऊन कसे बसे गाव गाठले त्या नंतर राजाराम, अहेरी, चंद्रपूर व उपचार करून नागपूर हलविण्यात आले मात्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
वन विभागाने घटना स्थळ गाठून पंचनामा करून आर्थिक मदत करण्यास पाठपुरावा केले.
काल. दिनांक 5जानेवारी रोजी अहेरी विधानसभेचे आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते हत्तीकॅम्प येथे मृतक शिवराम बामनकर यांच्या कुटूंबाला आर्थिक धनादेश वितरण करण्यात आले.
या प्रसंगी एस. नवकिशोर रेड्डी भावसे, उपवनसंरक्षक सिरोंचा,पी. व्ही. रेड्डी भावसे, उपविभागीय अधिकारी अहेरी,जि.जि. गडमडे वनपरीक्षेत्र अधिकारी कमलापूर,ए.”एस. माने वनपरीक्षेत्र अधिकारी परिक्षाविधीन,एम जे. धामनगे क्षेत्र साहाय्यक राजाराम,गुरुदास टेकाम , नागराज सिडाम,आतला, पोरठे वनरक्षक तसेच वनकर्मचारी उपस्थित होते.

