मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी जि.गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्रीमती शाहीन हकीम यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (शरदचंद्र पवार गट) यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष सौ. फौजिया खान मॅडम यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली आहे.
श्रीमती शाहीन हकीम यांनी आतापर्यंत महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम तसेच संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान दिले असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार आहे.
या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीमती शाहीन हकीम यांच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

