*lस्वर्गीय पूजा गेडाम स्मृती पित्यर्थ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो .9764268694
बल्लारपूर :-जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे सौ. अरुणा गेडाम, सौ. मीना गेडाम तसेच प्रमुख उपस्थिती एम. डी. टोंगे(माजी मुख्याध्यापक), यु. के. रांगणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात आर. बी. अलाम सर यांनी सांगितले की, शिक्षणाची ताकत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिली. व मुलींसाठी तो मार्ग दाखवणाऱ्या आद्य शिक्षिका होत्या.
यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे, शिक्षण घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
माजी मुख्याध्यापक एम. डी. टोंगे सर यांनी सांगितले की, स्त्रियांच्या परिस्थितीला सावरण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले आणि त्यांनी हे दाखवून दिले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
याप्रसंगी सौ. अरुणा गेडाम व सौ. मीना गेडाम यांच्या हस्ते स्व. पूजा गेडाम यांच्या स्मृति पित्यर्थ शाळेतील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश चे वाटप करण्यात आले.
आपले अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अफाट आहे त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे आणि मुलींनी त्यांचा वसा कायम ठेवला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘बालिका दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. याप्रसंगी त्यांनी गेडाम परिवाराचे सुद्धा आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एन. लोधे मॅडम, आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक आर. के. वानखेडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचारी सहित विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

